Monday, June 11, 2012

फोल्डर : मन > सब-फोल्डर : बहीर्मन

"पाऊस येणार.. पाऊस आला"
"फ्रान्स-इंग्लंड..तुंबळ होणार आज"
"पालख्या निघाल्या का?"
"या अर्णब गोस्वामीचे तोंड कसे दुखत नाही?"
"बा.भ. बोरकरच बेस्ट"
"RLM & EDI Latest Version चे User Guides डाऊनलोड करायला हवेत.."
"कोकण यार..... अहाहाहा"
"रेफ्री कसे नेमतात फुटबॉल मॅचला काय माहित?"
"काय पण म्हणे पाप-पुण्याचे हिशोब.."
"सायनस साठी आल्याचा चहा हा केवढा मोठा रिलीफ आहे"
"रेनकोट आपण खुप स्वस्तातला आणलाय का?"
"संपत्ती-सोहळा नावडे जीवाला, लागलासे टकळा पंढरीचा"
"कसली बकवास आहे बॅंक ऑफ महाराष्ट्रची डेबिट कार्ड डिव्हीजन"
"ती गेली तेंव्हा रिमझिम.. पाउस निनादत होता.."
"लोक कसे काय तासन‍तास फेसबुकवर बसून असतात?"
"अलिबागचा पावसाळा... कमाल"
"लिखाण बंदच पडलंय राव माझं.."
"आज वॅन रूनी खेळणार आहे का?"
"इथे खाजवायला फुरसत नाही आणि याचा कसला मध्येच फोन?"
"ज्ञानेश्वरांना ओळखूच शकलो नाही आपण"
"AIEEE चा result वाईट्ट बेकार लागला राव.. बरीच मुलंमुली नाराज असतील"
"महागाई..."
"मंजुषा पाटील शास्त्रीय गाते का एवढी भारी?"
"३बीएचके किती ऐसपैस वाटत असेल ना.."
"सुट्टी हवीये २-३ दिवस तरी.."
"नेटबॅकींग आल्यापासून हे एक बरं आहे"
"सॅमसंग एस-३ घ्यावा का?"
"घरी आणलेले पांढरे कांदे संपत नाहीयेत अजून"
"ती लाल केशरी संध्या निघताना अडखळलेली"
"यमन..... भेंडी यमन......."
"कै च्या कै सुट्ट्या शिल्लक आहेत हां आपल्या"
"चेक कुणी वापरते का आजकाल?"
"क्लायंट रात्री काय मीटींग ठेवतो राव?"
"ACP प्रद्युम्न बोअर होत नसेल काय?"
"शब्दाचिया आसकडी । भेदनदीच्या दोही थडी । आरडाते विरहवेडी । बुद्धीबोधु ॥"
"काय ओव्या लिहीतात ज्ञानोबा..वाह...."
"या झोपेचे काय करावे???"
"कसे कसे लोक असतात ना?"
"म्हणे पॉझिटीव्ह बना..."
"आता ही कोण नवीन मुलगी? जीन्स बरी आहे पण.."
"ज्ञानेश्वर महाराजांसारखा ऑल राऊंडर पुन्हा होणे नाही"
"हे कोण लोक असतात जे कॅशमध्ये फ्लॅट घेतात?" 
"चहा........ अनिवार्य आता..."

 संदर्भ : कालच ऐकले की कॉन्शस आणि सब-कॉन्शस मन मिळून एका मिनिटाला एकावेळी ७०००० विचार चालू असतात. जरा शोधण्याचा प्रयत्न करतोय !!!!!