Tuesday, March 1, 2011

पुन्हा एकदा गझल..."सांग कश्याला?"

फेब्रुवारीच्या पावसाळी हवेत (?) लिहीत असलो तरी ही टीपीकल ’पावसाची गझल’ नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
ही रचना मान्यवरांना आज सकाळी दवाखान्यात बसले असता अशीच ’जनरल’ सुचली. चालीवर लिहीलेली माझी बहुधा पहिलीच गझल. सहा कडव्यात मिळून एक कथाकार मांडण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. खूप गूढ अर्थ नसला तरी श्लेष, सूक्ष्म चिमटे, विदारक सत्ये वगैरे वगैरे बरंच काही कोंबून हे शब्द लिहीले आहेत. पुढेमागे कामातून सवड मिळाल्यास प्रत्येक कडव्यावर थोडेबहुत लिहीण्याचा विचार आहे !!!
(चाल - संदीप खरे गझल "तिला चांगले जमते....")

पाहता मी डोळ्यात माझ्या
आसपास तुझे चालणे,
बोलायाचे नुसतेच मग
सांग कश्याला ते बोलणे ॥१॥
चारी दिशा, आठ प्रहरही
आमुचे वाट पहाणे,
वाटेवरती ’वाट लावूनी’
सांग कश्याला ते राहणे ॥२॥
जुन्या मनाने रचुनी अजुनी
पुन्हा नव्याने कविता,
शब्दांचीही साले काढीत
सांग कश्याला ती गायणे ॥३॥
सरता काळ, मिटता चित्रे
रंग अनामिक कुठले हे,
पांढर्‍यातही काळ्याला का
सांग कश्याला ते पाहणे ॥४॥
खरे काय नी काय खोटे
सगळी नुसती नवलाई,
दुसर्‍याला उगा पुसावी
सांग कश्याला ती कारणे ॥५॥
मावळतीचा गोळा दिसतो
माझ्या थकल्या संध्येला,
तारकांच्या नादी लागून
सांग कश्याला ते जागणे ॥६॥