Tuesday, January 18, 2011

स्तब्ध..

ही अशी निष्प्राण दुपार
आणि तो ओसरलेला दुनियेचा भर
मला एकदम झेन साधूची आठवण करून देते...
"Sitting quietly,
sitting silently,
doing nothing,
spring comes
and
the grass grows by itself....” - Zenerin
पळायचा आवेग ओसरला की
ऐकू येतो प्रत्येकाला आपल्याच श्वासांचा ताल,
कर्ताकरविता तो असं एकदा म्हणून टाकलं की
कशी बदलून जाते या रानामधली चाल....
तुम्हाला कधी जाणवलीये का भर दुपारी हसणारी सावली?
कोलाहल कमी होऊ द्या आत-बाहेरीचा -
’असण्या’पेक्षा ’नसण्या’चं सुख फार मनोहारी असतं बरं.... विराटात मिसळून जायची तहान लई भारी !!!
"शून्य-निःशून्याचे बीज महाशून्य । भेटविले धन्य हरीरूप ॥" - स्वामी स्वरूपानंद
दुपार म्हटले की हे सगळं आलंच हो,
शांत गुरफटून बसणं......अचानक आठवलेलं ते कुण्या काळचं गाणं आणि आत आत अंधार्‍या तळघरात जाणवत राहणारं आपल्या अस्तित्वाचं गार्‍हाणं !!!!!!
ये जवळी, घे जवळी,
प्रिय सखया भगवंता,
वेढूनी मज राहसी का,
दूर दूर आता.......

2 प्रतिक्रीया:

ulhasbhide said...

"पळायचा आवेग ओसरला की
ऐकू येतो प्रत्येकाला आपल्याच श्वासांचा ताल"

..... छान .... आवडलं

aartiam said...
This comment has been removed by the author.