Tuesday, July 20, 2010

विडंबन – 'भय इथले संपत नाही....'

अतिकामामुळे वैतागलेल्या प्रोफेशनलच्या लेखणीतून उतरलेले अजून एक विडंबन... हा प्रोजेक्ट संपेपर्यंत अश्या ओकार्‍या अधूनमधून येत राहणार आणि तुम्हाला त्या सहन कराव्या लागणार... can’t help !!

काम इथले संपत नाही…

काम इथले संपत नाही,
मज माझी ’कीव’ची येते,
लंच संध्याकाळी खातो
तू माझी खवळली पित्ते.... ॥धृ॥

ते चार्ट मंद मरणाचे,
ती सिस्टीम खाई काया..
पीसीशी थिजलो आपण
डेटात पुन्हा उतराया... ॥१॥

तो लोड अंग गळवासा,
आयुष्य कुंथवुनी गेला...
’फेसबुक’च्या जंजाळातील
जणू स्टेटस अपडेट केला... ॥२॥

कामात टीम ही अवघी
धडपडती, ओझे मणाचे...
हे सरता संपत नाही
भांडणे तुझ्या प्रोजेक्टचे... ॥३॥
**************************************************************************
मूळ कविता -
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते ॥धृ॥
ते झरे चंद्रसजणांचे
ती धरती भगवी माया
झाडाशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया ॥१॥
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव-शेला ॥२॥
स्तोत्रात इंद्रीये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे ॥३॥
-कवि ग्रेस