Monday, April 5, 2010

Happy Birthday, Mugdha Vaishampayan !!!!

*********************************************************************************
५ एप्रिल २०१०...... आज मुग्धाचा वाढदिवस.........
*********************************************************************************
मी एकदा झाडाला विचारलं,
झाडा, झाडा मला ईश्वराविषयी सांग,

आणि ते झाड बहरून आलं – (जपानी हायकू, झेन)

(त्या झाडाचं असणं, फुलणं हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा, त्याच्या कृपेचा पुरावा !!!)

“एवढी अप्रतिम, अवघड गाणी गाताना तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू असतं?” मी एकदा न राहवून मुग्धाला विचारलं.
एकदम निःशब्द होऊन आपल्या टप्पोर्‍या डोळ्यांनी ती खिडकीबाहेर पाहू लागली.....
*********************************************************************************
Have you ever heard mystic sound of ocean waves on full moon night?
Have you ever heard the shrill voice of tropical wind while cutting across those tall Bamboo woods?
Have you ever heard the melody created by falling raindrops and its background cloud?
And have you ever heard, in your lifetime, the peculiar rhythmic music originated from you every moment by your own breathing?
Mugdha’s singing reminds us all those cosmic tunes being played in the universe uninterruptedly.
Her voice has magical charm of elevating the agitated mind to a different soothing & enriching realm of pure bliss.
*********************************************************************************
कुठे चंद्रबिंबाच्या धारांची शीतलता, कुठे हिवाळ्यातल्या उबदार किरणांची मृदूता, कुठे नुकतीच पालवी फुटलेल्या नवथर हिरवाईची कोवळीक तर कुठे उदात्त भावना प्रेरीत करणारा गाभार्‍यातील धूपाचा रोमांच.....
मुग्धाचं गाणं वेड्या मनाला कुठेकुठे घेऊन जाईल काही नेम नाही....
*********************************************************************************
Thy infinite gifts come to me,
In a very little hands of mine,

Ages pass, you still pour,

And still there is room to fill – (Sir Rabindranath Tagore)

स्वैर भाषांतर –
“तुझ्या अनंत भेटी येत राहतात, माझ्या इवल्याश्या हाती,
युगानेयुगे तुझं ते ओतणं चालूच आहे, आणि अजूनही जागा आहे ओंजळीत किती”....
*********************************************************************************
मुग्धाचं गाणं आपल्याशी बोलतं.....आपल्याला काहीतरी देउन जातं..... आपल्या अंतरंगात एक निर्मोही चीज छेडतं..... आपल्याला भावविभोर करतं.... आपल्याला अंतर्मुख करतं.....
ती गात राहते तिच्याच नादात, तिच्याच तालात, तिच्याच छोट्याश्या विश्वात. आनंदाचा झरा मात्र उसळतो आपल्या आत......
तिचं गाणं मोठ्या आवडीनं ऐकावं. त्याबरोबर झुलावं. त्याबरोबर हसावं. त्याबरोबर चालावं. त्याबरोबर हरखावं. आणी एकदा तरी त्याबरोबर एकरूप होऊन जावं. बास्सं!!!
*********************************************************************************
’बड़ा नटखट है ये कृष्णकन्हैया, का करे यशोदामैया’असे आपले चिमुकले हात पुढे करून विचारणारी मुग्धा आपल्याला थेट त्या रांगणार्‍या बाळकृष्णाच्या आजूबाजूला घेउन गेली. ’राधा क्यों गोरी, मैं क्यूं काला’ असे निरागसपणे विचारणारी मुग्धा काय किंवा ’चल उठ रे मुकुंदा’ अशी हळूवार भूपाळी गाणारी मुग्धा काय... अत्यंत नितळपणे ऐकणार्‍याला भगवद्चरीत्रातल्या एकेक ओळखीच्या जागा दाखवण्याचं तिचं काम तिच्याही नकळत चालू असे. ’जळी वाकून मी घट भरताना, कुठून अचानक आला कान्हा’ यात खट्याळपणा, ’नाचत होते हरिमंदिरी’ मध्ये समरसतेतली बेधुंद धांदल, ’वृंदावनी वेणू वाजे’ मध्ये मुरलीची जादू, ’घट डोईवर’ म्हणताना ओतलेला जीव, ’श्रीरंगा कमलाकांता’ असे अत्यंत उल्हासित करणारे आळवणे, ’पैंजण रुमझुमले’ किंवा ’वाजवी पावा गोविंद’ यातील प्रतिकात्मक, सुक्ष्म प्रेम, ’तुझ्या मुरलीने तहानभूक हरली रे’ मधली एकरूपतेची सायुज्यभक्ती असे कितीतरी आविष्कार दाखवत मुग्धाने आपल्या सर्वांना अक्षरशः कृष्णमय करून टाकलं होतं. बद्धाला ईश्वरीय दास्यत्वाच्या राजमार्गाकडे घेऊन जाणारी सूरांची ताकद ही मुग्धाची आपल्या सर्वांसाठीची सगळ्यात मोठी उपलब्धी होती.
*********************************************************************************
मुग्धाच्या गाण्यामधला सगळ्यात चित्तवेधक भाग कोणता?
तिचा मंत्रमुग्ध करून टाकणारा गोड आवाज, तिची versatility, तिचं ते भावनांना हात घालणं, तिची सहजता, तिचा निरागसपणा, तिचा गाढा अभ्यास, तिची सादरीकरणाची शैली का तिचा मोहक appearance? उत्तर देणं अवघड आहे.
पण या कश्याचाही विचार न करता हजारो लोक मुग्धामय होऊन गेले. तिच्या संगतीत डोलले. तिला पाहण्यासाठी कासावीस झाले. This is the unexplainable magic of angel called “Mugdha Vaishampayan” !!!
*********************************************************************************
“भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत गा
गा रे कोकिळा गा............ ॥
सप्तसुरांचा स्वर्ग उभारुन,
चराचरांना दे संजीवन,
अक्षय फुलवित हे नंदनवन, पर्णफुलातुन गा ॥“
*********************************************************************************
(पोस्टचा काही भाग माझ्या पुर्वी प्रकाशित झालेल्या विविध लेखांमधून)