Monday, March 29, 2010

इतकं काही अवघड नसतं..

(ऑरकूटवरील ’मुक्तपीठ’ कम्युनिटीवर ’खेळ शब्दांचा’ मध्ये प्रकाशित झालेली माझी कविता)
इतकं काही अवघड नसतं
एखाद्याचा निरोप घेणं
इतकं काही अवघड नसतं
एका क्षणात भूतकाळ होणं ॥१॥

इतकं काही अवघड नसतं
सुटत्या हातांना सोडून देणं
इतकं काही अवघड नसतं
मनाला दुसरीकडं नेणं ॥२॥

इतकं काही अवघड नसतं
एकदम पाठ फिरवणं
इतकं काही अवघड नसतं
डोळ्यातल्या अश्रूंना थोपवणं ॥३॥

इतकं काही अवघड नसतं
गाता राग तस्साच सोडणं
इतकं काही अवघड नसतं
मौनातल्या सूरांना घट्ट वेढणं ॥४॥

इतकं काही अवघड नसतं
थरथरत्या पायांनी तिथून निघणं
आणि खरचं...
इतकं काही अवघड नसतं
उद्याच्या सूर्याची वाट बघणं.... ॥५॥