Saturday, March 13, 2010

मुग्धा वैशंपायन बनली पार्श्वगायिका

मित्रांनो,
आपली लाडकी ’लिटल मॉनिटर’ - मुग्धा - आता पार्श्वगायिका बनली आहे.
NDTV-Imagine या वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या ’काशी’ या दैनंदीन मालिकेसाठी मुग्धा गायन करीत आहे.
या हिंदी मालिकेची प्रमुख नायिका असलेल्या काशी या पात्रासाठी मुग्धा काही गाणी गाणार आहे.
संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी स्वरबद्ध केलेले 'हमने देखा सपना, दुनियाको माना अपना हे थीम-सॉंग मुग्धाने रेकॉर्ड केले.
आत्तापर्यंतच्या भागांपैकी १२ मार्चला रात्री आठ आणि अकरा वाजता दाखवण्यात आलेल्या एपिसोडमध्ये या गीताचा काही भाग समाविष्ट करण्यात आला.
यापुढे कथानकाच्या मागणीप्रमाणे हे गाणे अधूनमधून दाखवण्यात आणि वाजवण्यात येईल.
तसेच प्रसंगानुरूप ’काशी’ या नायिकेच्या जीवनात येणारी पुढील सर्व गाणी ही मुग्धा गाणार आहे.
थोडेसे तिच्या पहिल्या व्यावसायिक गाण्याबद्दल,
मुग्धाचा आवाज नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर लागला आहे. मागच्या एका वर्षाचा रिजाय, ती घेत असलेली मेहनत आणि तिच्या आवाजाला मिळालेला प्रोफेशनल ट्च या छोट्याश्या गाण्यातून लगेच दिसून येतो आणि आपल्याला अवाक्‌ करतो.
मुग्धाचा आवाज मूळचा मधाळ असूनही इथे गाताना मात्र तिने संगीत दिग्दर्शकाच्या गरजेनुसार काहीसा भारदस्त पोत राखला आहे.
ही सर्व गाणी हिंदीमध्ये असूनही मुग्धाने कमालीच्या आत्मविश्वासाने गायली आहेत हे सांगणे न लगे.
मालिकेच्या श्रेयनामावलीत "Singer: Mugdha Vaishampayan"असे दाखवण्यास आधीच सुरूवात झाली आहे.
मुग्धाने आतापर्यंत तिला मिळालेल्या संधीचे नेहमीच सोने केले आहे. या महत्वपुर्ण कामगिरीबद्दल मुग्धाचे मनःपुर्वक अभिनंदन !!!
मुग्धाच्या व्यावसायिक पार्श्वगायनाची पहाट झालेली आहे. तिला अशीच स्वतंत्र, वैविध्यपुर्ण व ताकदीची अशी सुरेल गाणी मिळोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
मुग्धारूपी गान-वसंत परत एकदा आपली श्रवणेंद्रिये फुलवायला सज्ज झाला आहे. आपण सर्व जण याचा आनंद लुटूयात.
(पुर्ण गाणे टेलिकास्ट झाले की त्याचा यू-ट्युब व्हीडीओ मी इथे अपलोड करेन.)