Friday, February 19, 2010

माझे ’अर्कचित्र’

अखेर आज तो सुदीन उगवला. आपला मित्र आणि मराठीतील कार्टूनला वाहिलेला एकमेव ब्लॉग चालविणारा अतिशय प्रतिभावान कलाकार मीनानाथ धस्के याने माझे अर्कचित्र चितारले. माझ्या एकंदरीत विनोदी रूपाला (आणि अंगात असणार्‍या अनेक व्यंगाना) अनुसरून खरेतर याला व्यंगचित्रही म्हणता येईल. पण मीनानाथच्या शास्त्रीय परीभाषेत याला ’अर्कचित्र’ म्हणतात. त्याच्या कलेला आणि कुशाग्र बुद्धीमत्तेला माझा सलाम !!!

हे चित्र पहायला लागलो आणि तत्क्षणी माझ्या मोबाईलवर गाणं सुरू झालं...
’देवाघरचे ज्ञात कुणाला,
विचित्र नेमानेम,
कुणी रखडती धुळीत आणिक
कुणास लाभे हेम,
देवाघरचे ज्ञात कुणाला.......’

चित्रकाराची टिप्पणी - सदर इसम हा ध्यानाच्या पोजमध्ये एखादे शास्त्रीय संगीतातले पद ऐकायला बसला आहे !!! (जिकडे तिकडे दात काय दाखवत असतो कोणास ठाऊक???)