Thursday, January 21, 2010

इंग्रजी ब्लॉग वेगळा केला

मंडळी,
गेले दीड वर्ष मी या ब्लॉगवर जसे जमेल तसे लिहीतो आहे. सुरूवात इंग्रजीमधून केली, पण गेल्या काही महीन्यातील जवळपास सर्व लेख मराठी होते. मराठी वाचकांना आनंद झाला पण इतरांची थोडीशी गैरसोय झाली. माझ्या अमराठी मित्र-मैत्रीणींकडून विनंत्या आल्या की तुझे इंग्लिश लिखाण आम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळाले तर बरे होईल.
म्हणून आजच मी माझे सर्व इंग्लिश साहीत्य माझ्या दुसर्‍या व्लॉगवर http://tossthefeathers.wordpress.com वर हलवत आहे. आता हा http://vikrantdeshmukh.blogspot.com ब्लॉग फक्त मराठीतून लिहीण्यासाठी वापरेन !!!!!!!