Monday, January 11, 2010

हे स्वरदे ’दुबईश्वरी’.....

’सारेगम’च्या मंचावरून स्वरदा गोखले-गोडबोलेच्या अचानक बहिर्गमनाने विदीर्ण झालेल्या मनाला थोडे बरे वाटावे म्हणून आम्ही आमच्या प्रथम प्रेमाकडे (First Love) म्हणजेच कवितेकडे वळालो.

राग – मल्हार किंवा मिया की मल्हार (??)
चाल – भावनेच्या भरात चाल द्यायचीच राहून गेली....च्यक्, च्यक्...

आता कश्याला पहायचे सारेगम
अन् कशी ऐकायाची गाणी?
स्वरदेच्या स्वराविना स्पर्धा
’आयडीया’च किती केविलवाणी ॥१॥

आता कश्याला सहायचे पल्लवीचे हसणे
अन् कुठेही कश्या वाजवायच्या टाळ्या?
’महाअंतिम’ महागायिकेला
आता कश्या पडायच्या गाली खळ्या, ॥२॥

आता कसे सुचावे सलीलला विनोद
अन् कसा वाजायचा अवधूतचा चाबूक?
आता कसले मान्यवर पाहुणे
कसे मिळावेत एसेमेस आपसूक ॥३॥

आता कसे मिळावेत ’ध”नी”सा’
अन् कसा दिसावा तो डेंजर झोन?
आता नाही तो बॉटम थ्री
तसे मैदानी उरलयंच कोण? ॥४॥

आता कश्याला पाठवायची मते
अन् कसा ठरावा ’आजचा आवाज’
’पुन्हा नवे स्वप्न स्वरांचे’
रंगले, भंगले ’झी’वरी आज ॥५॥