Wednesday, December 23, 2009

जागतिक चित्पावन दिन

मित्रहो,
आज जागतिक चित्पावन दिन !!!
मला लहानपणापासून या कोकणस्थांविषयी प्रचंड आदर आणि आत्मियता आहे. या मंडळींमध्ये आढळणारे प्रमुख गुण म्हणजे बाणेदारपणा, तत्वनिष्ठा, तेज, मनाचा सरळपणा, प्रखर बुद्धिमत्ता, अभिजात सौंदर्य, चालण्या-बोलण्यातला नेमकेपणा व डौल, निष्कपटता, फणसाप्रमाणे बाहेरून कठीण पण आंतरीक मृदू असं व्यक्तिमत्व, चिकाटी आणि त्यांच्या सर्व जीवनाला व्यापून असणारी एक grace !!!!
माझ्या स्वतःच्या जीवनावर अनेक चित्पावन लोकांचा प्रभाव पडला आणि त्यांचे अनेक उत्तमोत्तम गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो.
अश्या या भगवान परशुरामांच्या वंशजांना हार्दिक शुभेच्छा. कला, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातले त्यांचे योगदान ईश्वरकृपेने असेच चालू राहो.
चित्पावनांच्या संपन्न इतिहासासंबधी सुंदर माहिती देणारा एक ब्लॉग श्री. सौरभ वैशंपायन या मुंबईस्थित तरूणाने २००७ साली लिहीला होता. तो नुकताच माझ्या वाचनात आला. त्याची लिंक इथे देत आहे. सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2007/11/blog-post_05.html