Monday, December 21, 2009

सारेगम –पर्व ७ भाग २१ डिसेंबर

सोमवार, दि. २१-डिसेंबर-२००९,
सारेगमच्या या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नवनवीन मान्यवर परिक्षक आणि त्यांची अभ्यासपुर्ण मतं. संगीत क्षेत्रातले सावनी शेंड्ये, हरीप्रसाद चौरसिया, राणु मुजुमदार, पं रघुनंदन पणशीकर असे एकामागून एक दिग्गज या स्पर्धेत येऊन गेले आणि काही ना काही देऊन गेले.
काल ’तबलासम्राट’ पं सुरेश तळवलकर हे पाहुणे परीक्षक म्हणून होते. सुरेशजींचा व्यासंग आणि अधिकार कितीतरी मोठा !!! त्यामुळे आजचा एपिसोड तर फारच रंगला.
पंडीतजींकडून दादरा, केरवा, ठुमरी, केहरवा अश्या अनेक तालांविषयी आणि त्याच्या खाचाखोचांविषयी अतिशय समर्पक व रसाळ भाषेत ऐकायला मिळालं.
एरव्ही फार क्लीष्ट किंवा रटाळ वाटणारे अनेक बारकावे पंडीतजींकडून फार छान पद्धतीने उलगडले गेले. शिवाय रागांविषयी अन् एकूणच गायनाविषयी त्यांची नेमकी मते मला आवडली.
असे एपिसोड झाले की मला अभिजात भारतीय संगीताविषयी प्रचंड अभिमान आणि आत्मीयता दाटून येते.
आपलं संगीत.....किती सखोल....किती विस्तीर्ण... किती परीपुर्ण.... किती हृदयस्पर्शी... किती उत्तुंग.... किती विवीधरंगी....सकळ जीवनाला व्यापून असणारं संगीत....
या वैभवाची पुन्हापुन्हा आठवण करून देत असल्याबद्दल झी मराठी आणि सारेगमप चे किती आभार मानू आणि किती नको???