Monday, November 9, 2009

Happy Birthday, Madhura

आजच्या तरूण पिढीतील एक अष्टपैलू, परीपक्व व अतिशय गुणी गायिका मधुरा दातार हिचा आज वाढदिवस !!
आपल्या सुमधूर गळ्याने हजारो रसिकांना स्वरमोहिनी घालणार्‍या मधुराचा संगीताचा गाढा अभ्यास तिच्या गाण्यातील perfectionमधून दिसून येतो.
सूरांवरची हुकुमत, गीतामधल्या भावाशी तन्मयता, सर्व तांत्रिक बाबींवरचं अचंबित करणारं नियंत्रण आणि त्याचबरोबर जतन केलेला निरागस सहजपणा ही मधुराच्या गायनाची ठळक वैशिष्ट्यं.....
याला जोड मिळते ती तिच्या नित्यप्रसन्न, नुकत्याच उमललेल्या टवटवीत गुलाबपुष्पासारख्या आनंदी चर्येची !! मधुराला ऐकणं हा त्यामुळंचं एक ताजातवाना करून टाकणारा, अंतरंगात सुखाची उधळण करणारा अनुभव होऊन बसतो.
Many Many happy returns of The Day, Dear Madhura !!!
तुझ्या सांगितीक व वैयक्तिक आयुष्यासाठी तुझ्या सर्व चाहत्यांतर्फे खुप खुप शुभेच्छा.
’मधुरा दातार’ या गोड आवाजाचा हा माधुर्यपुर्ण नजराणा आम्हा सर्व श्रोत्यांना असाच मिळत राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना......