Wednesday, September 2, 2009

सारेगम 30 August-1 September Episodes

काल मी माझ्या प्रतिक्रीया राखून ठेवल्या होत्या. आज दोन्ही भाग झाल्यानंतर आता यावर बोलायला हरकत नसावी.
1. पल्लवी परत आल्यामुळे कार्यक्रमात कसं एक वेगळंचं चैतन्य आलं. काही काही गोष्टींचं कसं नातं जुळून येतं. उदा. ’सुरभि’ आणि सिद्धार्थ काक, ’डेव्हील’स ऍड्वोकेट’ आणि करण थापर, ’आपकी अदालत’ आणि रजत शर्मा तस्सं सा रे ग म पल्लवीशिवाय ही कल्पनाचं करवत नाही. अजून तिने टाळ्यांचा आणि ’योगायोगाची गोष्ट अशी की’ चा अतिरेक केलेला नाही. त्यामुळे एकदम मस्त वाटलं. विशेषतः काल खुपच हृद्य प्रसंग होता जेंव्हा तिचा मोठा भाऊ स्वतः शूटींगला आला होता. पल्लवी सेंटी झाली असणार पण नेहमीच्या शैलीत तिने कार्यक्रम पुढे रंगवत नेला.
2. सलील-अवधूत यांची जबरदस्त फटकेबाजी चालूच आहे. सलीलचा मार्मिक विनोद तर अवधूतचा रांगडा विनोद पण दोघांचही कमालीच्या बारकाईने केलेलं परीक्षण यामुळे मधला भागही प्रेक्षणीय अन् श्रवणीय होतो. This is the ideal pair of judges which we all were looking for. नुसतंचं छान छान म्हणणं किंवा उठसूठ प्रत्येकाला बडवून काढून discourage करणं अशी दोन्ही टोके टाळून हे दोघे गुणवान परिक्षक आपले काम चोख बजावत आहेत.
3. एक सर्वात मोठी दाद द्यावीशी वाटली ती song selectionला. तीचतीच नेहमीची गाणी सोडून बरीचशी नवीन गाणी मार्गदर्शकांनी घ्यायला लावली. त्याचा वादकांनाही आनंद झालेला दिसला. एरव्ही सहसा माहित नसलेली अनेक उत्तमोत्तम गाणी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत या बद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलील-अवधूत आणि झी सारेगम च्या टीमसाठी !!! एकदम मज्जा आली. हे पुढेही असेच चालू ठेवावे.
4. आता थोडेसे स्पर्धकांबद्दल. स्पर्धेचा तणाव जाणवणं साहजिक आहे. त्यामुळे performances मध्ये खुप fluctuations होते. काहीकाही वेळा तर पहिल्या व दुसर्‍या गाण्यात जमिन-आस्मानाचा फरक दिसला. उदा. प्रियांका बर्वे, अनुष्का कांबळे, अपूर्वा गज्जला इत्यादि. या सर्वांना अजून भरपूर प्रवास करायचा असल्याने आत्ताच काही मतं बनवणं तितंकसं संयुक्तिक ठरणार नाही. काही काही स्पर्धकांचा मूळ गाणं जसच्या तसं गावं की आपणं improvise करून जागा घ्याव्यात असा गोंधळ उडालेला दिसला. स्वरदा, संहिता, आश्विनी ई. राहुलला तर सलीलने स्वतः सांगितले या बाबतीत.
5. एकंदरीत कार्यक्रमाचा रंग चढायला सुरूवात झालेली आहे. पाहूयात पुढेपुढे काय होतेय ते.