Friday, August 14, 2009

ॐ नमो भगवते वासुदेवाय

आज गोपाळकाला......भाव दाटून आलेले आहेत......काही लिहीणेही मुश्कील.....
भारतीय समाजमनाला कायमचे व्यापून राहिलेले दोन अवतारी पुरुष म्हणजे भगवान श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण.
"अगा ब्रम्ह या नावा । अभिप्रायो मीचि पांडवा" अशी छातीठोकपणे ग्वाही देणारे वासुदेव व त्यांचे तितकेच दिव्य लीलाचरीत्र आपल्याला शतकानुशतके, जन्मानुजन्म भुरळ घालतेच आहे.
’त्वमेव शरणं गच्छ, सर्वभावेन भारत’ ही त्यांनी केलेली आज्ञा काय फक्त त्या अर्जुनासाठीच होती?
त्यांची ती कर्णमधूर, मन मोहीत करणारी मुरली आपल्यालाही ऐकता येइल का?
'अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू, मी म्हणे गोपाळू, आला गे माये’ अशी चित्त हरपून गेलेली, कमालीची युक्त अवस्था आपलीही होइल का?
आज या पवित्र दिवशी त्या नील-सावळ्याचा जन्म आपल्याही हृदयात होवो अशी त्याच्याच चरणी प्रार्थना करूयात.

भगवंतांनी गीतेत सांगितलेल्या काही विशेष Direct Commandments -
त्वाम्‌ तितीक्षस्व भारत
तस्मात्‌ अपरिहार्येथे न त्वं शोचितुमर्हसि
तस्मात्‌ उत्तिष्ठ कौंतेय युध्यस्व कृतनिश्चयः
व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
योगस्थः कुरू कर्माणी संग त्यकत्वा धनंजय
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचीदपी चिंतयेत
आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यतीयोर्जुन
तस्मात्‌ योगी भवार्जुन
माम्‌ अनुस्मर युध्य च
यत्करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासि यत्‌, यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम
निमित्तमात्रम्‌ भव सव्यसाचिन्‌
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस मत्पराः