Sunday, July 5, 2009

Check Your 'MQ' – Mugdha Vaishampayan Quotient

आपल्या सर्वांनाच खरं तर मुग्धाचं कौतुक. तिच्यावर आपलं अलोट प्रेम. या प्रेमाची प्रतवारी ठरवण्याचं तसं काही कारण नाही. पण एकदा डोकावून पाहू यात आपल्या आत, आपल्याच मुग्धाभक्तीकडे. इथं बुद्धिचं काम नाही हे मान्य. पण तपासूयात तर आपला मुग्धाभ्यास किती आणि कसा? आपल्या स्मृतीपटलावर किती ताजी आहे तिची जादू. आपल्या किती खोल उतरले होतं तिचं गायन. अर्थात हे सगळं केवळ गंमत म्हणून बरं का. बाकी तिच्या आठवणी अन् आपण अनुभवलेला तिचा रम्य काळ हा सदैव मनात रूंजी घालत राहणार यात काहीही शंका नाही.
खाली काही प्रश्न आणि प्रत्येकासमोर उत्तरासाठीचे चार पर्याय दिलेले आहेत. यापैकी फ़क्त एकच पर्याय अचूक आहे. यातून एक पर्याय निवडा आणि सर्वात शेवटी खाली दिलेल्या उत्तरांशी तपासून पहा. प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण द्यावा अन् चुकलेल्याला शून्य. सर्व गुणांची बेरीज करा आणि दिलेल्या कोष्टकातून आपला निकाल पहा.

(१) मुग्धाचा वाढदिवस कधी असतो?
a) ५ एप्रिल
b) ४ एप्रिल
c) ६ एप्रिल
d) २ एप्रिल

(२) या गाण्याला मुग्धा टाईमिंग चुकल्याने नव्वद सेकंद एकाच जागेपाशी थांबून होती.
a) लपविलासी तू
b) जीवलगा कधी रे
c) यशोमती मैयासे
d) खुलविते मेहंदी

(३) सा रे ग म च्या एपिसोडमध्ये मुग्धाने नाचत नाचत सादर केलेलं गाणं कोणतं?
a) छडी लागे छम छम
b) डोकं फिरलया
c) अरे अरे पावट्या
d) बाई माझी करंगळी मोडली

(४) मुग्धाचा SMS साठीचा स्पर्धक क्रमांक काय होता?
a) 11
b) 14
c) 10
d) 12

(५) सा रे ग म पर्व चालू असताना मुग्धा पुणे येथील कोणत्या संगीत महोत्सवात सहभागी झाली होती?
a) पं. भास्करबुवा बखले
b) सवाई गंधर्व
c) पं. वसंतराव देशपांडे
d) श्रीमंत दगडुशेठ संगीत महोत्सव

(६) खालील पैकी कोणत्या एका गाण्यात मुग्धाची हेयर-स्टाईल इतर तीन गाण्यांपेक्षा खुप वेगळी होती?
a) विसरू नको
b) चल उठ रे मुकुंदा
c) देव जरी मज
d) अंग अंग तव अनंग

(७) मराठी पंचागानुसार मुग्धाचा जन्म या दिवशी झाला.
a) चैत्र शुद्ध नवमी
b) चैत्र शुद्ध प्रतिपदा
c) चैत्र शुद्ध पौर्णिमा
d) चैत्र शुद्ध पंचमी

(८) खालीलपैकी कोणत्या गायिकेचे गाणे मुग्धा गायली नाही?
a) उत्त्तरा केळकर
b) बकुळ पंडीत
c) सुलोचना चव्हाण
d) सुमन कल्याणपूर

(९) यापैकी कोणतं गाणं मुग्धा तार-सप्तकात (High Octave) गायली नव्हती?
a) खेड्यामधले घर कौलारु
b) नारायणा रमा रमणा
c) कमोदिनी काय जाणे
d) तुला पाहते रे

(१०) हे हिंदी गाणं मुग्धाने गायलेलं नाही.
a) पवन दिवानी
b) बड़ा नटखट है
c) आज राधा को श्याम
d) लो चली मै

(११) मुग्धाचं मूळ गाव कोणतं?
a) किहीम
b) खानाव
c) अलिबाग
d) रायगड

(१२) खालीलपैकी कोणत्या गाण्याचं फक्त एकच कडवं सा रे ग म च्या एपिसोडमध्ये मुग्धाने गायलं होतं?
a) हुरहुर असते
b) मनीमाउचं बाळ
c) चाफा बोलेना
d) कंठातच रुतल्या ताना

(१३) मुग्धाने गायलेल्या या गाण्यांपैकी कोणतं गाणं हे मूळ देखील स्त्री गायिकेच्या आवाजातच आहे?
a) श्रीरंगा कमलाकांता
b) विकलमन आज
c) चल रे शिरपा
d) कोटी कोटी रूपे तुझी

(१४) खालीलपैकी कोणत्या गाण्याला मुग्धाने एपिसोडमध्ये Once More घेतला नाही?
a) एकवीरा आई
b) परीकथेतील राजकुमारा
c) बाई माझ्या नथीचा
d) डार्लिंग डार्लिंग

(१५) खालीलपैकी कोणत्या गाण्याला मुग्धाने कोरस वापरला नव्हता?
a) जांभूळ पिकल्या झाडाखाली
b) एकवीरा आई
c) मैफ़िलीचा रंग
d) जिंकू किंवा मरू

उत्तरे –
१ a २ d ३ b ४ d ५ c ६ d ७ b ८ a ९ a १० c ११ b १२ d १३ b १४ d १५ c

तुमचे गुण - ________

निकाल –

१३ ते १५ – हार्दिक अभिनंदन. तुम्ही खरोखरच पुर्ण मुग्धामय झाला होतात आणि आहातही. मुग्धाने तिच्या गायनामधून अन् दर्शनातून केलेली आनंदाची बरसात तुमच्या अगदी अंतरंगात झिरपलेली आहे. हा दैवी सुगंध असाच जपून ठेवा आयुष्यभर !!!!
९ ते १२ – तुमचं मुग्धावरचं निस्सीम प्रेम हे कौतुकास्पद आहेचं. तुम्ही एके काळी खूप रंगून गेला होतात तिच्या विश्वात. किंचीतशी उजळणी करण्याची गरज आहे. आठवा आपल्या ’लिट्‍ल मॉनिटरला’ आणि जा बुडून तिच्या सूरांमध्ये पुन्हा एकदा.
४ ते ८ – इतक्या बिलोरी चांदण्यात, इतक्या सुगंधी गानवर्षावात तुम्ही रुक्ष, कोरडे राहूच कसे शकलात? तुम्हाला तर मुग्धा खूप आवडली होती ना? पण ते भावासहीत अवगाहन करणं राहूनचं गेलं तुमच्याकडून. हरकत नाही. तुम्ही मुग्धाला पाहिलं, ऐकलं हीही काही कमी भाग्याची गोष्ट नाही.
0 ते ४ – या गटात कोणी असणं अशक्यचं. पण दुर्देवाने कोणी सापडलाचं तर परमेश्वरा, त्याच्यावर कृपा कर, अश्या अभागी जीवनात स्वरप्रकाशाची एखादी तरी मिणमिणती ज्योत लागावी हीच माझी तुझ्याचरणी प्रार्थना !!!


Links -
  1. मुग्धाच्या वाढदिवसाचा ब्लॉग - http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/04/blog-post.html
  2. English Article - The Conjuration Called Mugdha - http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/06/reminiscences-of-mugdha.html