Wednesday, June 17, 2009

पाउले चालती पंढरीची वाट

आज पुण्यात पालख्या येणार..............
ज्ञानोबा, तुकोबांच्या परमपवित्र आगमनाने पुण्यनगरी पुन्हा एकदा पावन होणार...........
’माझ्या जीविची आवडी।पंढरपुरी नेईन गुढी।’ म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज किंवा ’तुका म्हणे मज धाडिले निरोपा। मार्ग हा सोपा सुखरूप॥’ अशी ग्वाही देणारे तुकोबाराया आपल्या शहरात येतात, थोडा काळ विसावा घेतात, ही किती भाग्याची गोष्ट..... नाही का?
ते येतात आणि येताना त्यांच्या बरोबर भावाचा, भक्तिचा महापूर घेउन येतात.
या सर्वच संतांनी त्यांच्या अभंगांमधून, ग्रंथातून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या स्वत:च्या जीवनातून परमात्मप्रीतीचा, शुद्ध परमार्थाचा जो तेजस्वी उपदेश केला त्याची आठवण करण्याचा हा दिवस.
आज त्यांचे दर्शन घेताना, त्यांच्या पादपद्मी आपल्याला समर्पित करताना, त्यांना अपेक्षित असलेलं भगवद्‍भक्तीचं जीवन आपल्या प्रत्येकाकडून आचरलं जावं अशी प्रार्थना करूयात.
"ज्ञानोबा माउली, तुकाराम...... ज्ञानराज माउली तुकाराम".............