Tuesday, June 2, 2009

माझिया मना

काळजाचा बंध,
उसास्याचा गंध,
श्वास मंद,
अगतिक छंद,
मनाचे वारू अनिवार ॥१॥
कोवळ्याच चुका,
निजभाव सुका,
शब्दही मुका,
प्रयत्न फुका,
मनाची सोंगं भारंभार ॥२॥
आकाश खुजे,
मैत्रही दुजे,
मनोगत बुजे,
व्यथा रूजे,
मनाची वेदना धारदार ॥३॥
सृष्टीचे चरण,
अबोल मरण,
अश्रुंचे भरण,
स्वप्नांचे सरण,
मनाचा अगम्य कारभार ॥४॥
- विक्रांत देशमुख