Tuesday, May 26, 2009

इंजिनदादा इंजिनदादा

About it - The other day I was wandering on platforms of Pune Station and saw one beautiful WDM awaiting sideways. (Not the one in this picture !!!!)
Shear graceful but subdued. Majestic but silent. Mighty but alone.
Below poem is born after seeing the plight of that exhausted diesel locomotive.

इंजिनदादा इंजिनदादा
दमलात का?
डब्यांची ओझी ओढून
शीणलात का? ...............................................ध्रु
इंजिनदादा तुमचा किती
रुबाब असतो भारी
घाटातून जाताना
देता ललकारी
वाघिणीतला माल वाहून थकलात का ...........१
इंजिनदादा तुमच्याकडे
धूरांच्या या रेषा
शिट्ट्य़ांच्या संगीतात
नाचतात कश्या
लोखंडी या रूळांवर रूसलात का ....................२
इंजिनदादा चाकांची ही
केवढी मोठी गती
वार्याच्याही वेगाला
लाजवते गती
फलाटाच्या संगतीला मुकलात का .................३
इंजिनदादा तुम्ही असे
उभे एकाकी
हिरवा दिवा बघा
आता काय बाक़ी
बदलणार्या सांध्यांना विटलात का .................४
इंजिनदादा रूप तुमचं
किती देखणं गोड
लावत असता सर्वाँना
प्रवासाची ओढ
फिरायचे सोडून शांत बसलात का ..............५
(कवी - विक्रांत देशमुख)