Thursday, August 14, 2008

मी कोणी एक..


मी कोणी एक पांथिक,
नवनिर्मितीच्या सुखद स्पर्शाने हरखून जाणारा,
जुन्या आठवणींच्या पाठलागात,
मनाला गुंतवून ठेवणारा,
मी कोणी एक बहुरूपी,
चेहरे बदलणारा,
आत डोकावू न देता,
बाहेर खूप भुलविणारा,
मी कोणी एक सखा,
दूर दूर राहणारा,
भिजल्या डोळ्यानी, अंतर ठेवून,
मैत्रीची गीते गाणारा,
मी कोणी एक भिरभिरता वारा,
नवनवीन क्षितिजे पार करणारा,
आसमंत भरून श्वास घेत,
सर्वांना कवेत घेणारा,
मी कोणी एक जीव,
स्फुट हसू फुलवू पाहणारा,
लोकांना आनंद देताना,
माझ्या एका अनामिक शोधात फिरणारा.........

........विक्रांत देशमुख